ऑस्ट्रेलियाची घोषणा! 1991-92 नंतर पहिल्यांदाच घडणार... IND vs AUS कसोटी मालिकेसाठी घेतला मोठा निर्णय

India vs Australia Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमधला सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.
India vs Australia Border Gavaskar Trophy Marathi News
India vs Australia Border Gavaskar Trophy Marathi Newssakal

India vs Australia Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमधला सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाते. मात्र आता या मालिकेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये चार ऐवजी पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी याची घोषणा केली. 1991-92 नंतर पहिल्यांदाच या दोन देशांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

India vs Australia Border Gavaskar Trophy Marathi News
MI vs CSK IPL 2024 : ठरलं तर मग... एकच होणार एल क्लासिको! पांड्याच्या होम ग्राऊंडवर ऋतुराजची CSK 'या' तारखेला देणार MI ला टक्कर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'X' वर पोस्ट केले आहे की, 1991-92 नंतर पहिल्यांदाच या उन्हाळ्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ही मालिका 2024-25 च्या देशांतर्गत वेळापत्रकाचे मुख्य आकर्षण असणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.

याबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सोशल मीडियावर दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह म्हणाले की, बीसीसीआय नेहमीच कसोटी क्रिकेटचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. हे खेळाचे एक स्वरूप आहे ज्याचा आपण खूप आदर करतो. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला पाच सामन्यांची कसोटी मालिका बनवणे हे क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतचे आमचे सहकार्य आणि कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्याची आमची सामूहिक वचनबद्धता दिसून येते.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जाऊ शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेयर्ड म्हणाले की, आमच्या दोन देशांमधील तीव्र स्पर्धा पाहता, बॉर्डर गावसकर ट्रॉफी आता पाच कसोटी सामन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com