India face Australia today
esakal
कॅनबेरा, ता. २८ ः भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी (२०२६) टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन भारत व श्रीलंका या देशांमध्ये करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे बघण्यात येत आहे. याप्रसंगी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या फलंदाजी फॉर्मकडे विशेष लक्ष असणार आहे.