Ind vs Eng 5th Test : इंग्रजांचा तीन दिवसात खेळ खल्लास! कुलदीप-अश्विनपुढे टेकले गुडघे, टीम इंडियाने मालिका 4-1 अशी जिंकली

India vs England 5th Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला.
Ind vs Eng 5th Test Marathi News
Ind vs Eng 5th Test Marathi Newssakal

India vs England 5th Test Dharamsala : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली.

धरमशाला कसोटी सामन्यात इंग्रजाचा तीन दिवसात खेळ खल्लास झाला. तत्पूर्वी, चारही सामने चौथ्या दिवसापर्यंत गेले होते. टीम इंडियाचा हा विजय खूप ऐतिहासिक आहे कारण कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षांनंतर, पहिल्या कसोटी सामन्यात पराभवानंतर संघाने 4-1 पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे.

Ind vs Eng 5th Test Marathi News
Rohit Sharma Ind vs Eng : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार रोहित का गेला बाहेर? BCCI ने दिली मोठा अपडेट

शेवटच्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 57.4 षटकात 218 धावांवर आटोपला. भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावात पाच बळी घेतले, तर शंभरावी कसोटी खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विननेही चार बळी घेतले, रवींद्र जडेजाला एक बळी मिळाला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.

Ind vs Eng 5th Test Marathi News
Ind vs Eng : अश्विनचा 100 व्या कसोटीत तांडव, ब्रिटिशांचे मोडले कंबरडे अन्...

टीम इंडियाच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार शतके करत केलेली 171 धावांची भागीदारी त्यानंतर सर्फराझ खान व देवदत्त पडिक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 477 धावापर्यंत मजल मागली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आठ विकेट्सवर 473 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली, पण अवघ्या चार धावा करत उर्वरित दोन विकेट गमावल्या. कुलदीप यादव (30) बुमराह (20) आऊट झाले आणि टीम इंडियाने 259 धावांची मोठी आघाडी घेतली.

Ind vs Eng 5th Test Marathi News
Rohit Sharma Ind vs Eng : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार रोहित का गेला बाहेर? BCCI ने दिली मोठा अपडेट

दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात अश्विनने बेन डकेटला (2) धावसंख्येवर बाद केले. यानंतर सहाव्या षटकात 21 धावांवर जॅक क्रॉली खाते न उघडता बाद झाला आणि तोही अश्विनने घेतला. यानंतर अश्विनने 10व्या षटकात 36 धावांवर ऑली पोप (19) यालाही बाद केले.

येथून जॉनी बेअरस्टोने (31 चेंडूत 39) वेगवान खेळी खेळली आणि जो रुटसोबत चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली, मात्र 18व्या षटकात कुलदीप यादवने बेअरस्टोला धावांवर बाद करून इंग्लंडला चौथा धक्का दिला. यानंतर, उपाहारापूर्वी, बेन स्टोक्स (2) देखील 23व्या षटकात आऊट झाला. अश्विनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांचा डाव 195 धावांवर आटोपला. उपाहारानंतर खेळ सुरू झाला तेव्हा अश्विनने बेन फॉक्सला क्लीन बोल्ड केले. या विकेटसह अश्विनने आपली शंभरवी कसोटी खेळत डावात पाच बळीही पूर्ण केले. कसोटीत पाच बळी घेणारा हा त्याचा 36वा सामना आहे.

यानंतर बुमराहने एकाच षटकात 2 बळी घेत इंग्लंडला पराभवाच्या दिशेने ढकलले. मात्र, या सगळ्यात जो रूटने एक टोक पकडून अर्धशतक झळकावले. 84 धावा करून तो शेवटचा विकेट म्हणून बाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com