Ind vs Eng Test : थंड हवामानात भारतीयांचा कस ; पाचव्या कसोटीसाठी धरमशालातील वातावरण इंग्लिश संघाला पोषक

निसर्गरम्य आणि डोंगरांच्या कुशीत असलेल्या धरमशाला येथील पाचवा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. हिमालय आणि आसपासच्या परिसरात अजूनही बर्फ पडत असल्यामुळे धरमशालेतील कमीत कमी तापमान ८ अंश सेल्सियस आहे.
Ind vs Eng Test
Ind vs Eng Testsakal

धरमशाला : निसर्गरम्य आणि डोंगरांच्या कुशीत असलेल्या धरमशाला येथील पाचवा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. हिमालय आणि आसपासच्या परिसरात अजूनही बर्फ पडत असल्यामुळे धरमशालेतील कमीत कमी तापमान ८ अंश सेल्सियस आहे. भारतीय खेळाडू मायदेशात खेळत असले, तरी त्यांच्यासाठी हे अगदीच थंड वातावरण असल्यामुळे त्यांचा कस लागू शकतो.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ विजयी आघाडी घेतलेली असली, तरी शेवटच्या धरमशाला कसोटी सामन्याला डेड रबर म्हणण्याची तयारी दोनही संघ दाखवणार नाहीत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी प्रत्येक कसोटी सामना मोलाचा असल्याने अंतिम कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ तयार झाले आहेत.

हिमाचल प्रदेशात वसलेल्या धरमशाला गावी आल्यावर नेहमीप्रमाणे सामन्याच्या दोन दिवस अगोदर भारत आणि इंग्लंड दोनही संघांनी जोरदार सराव केला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर खेळाडू क्रिकेट सामन्याच्या तयारीला लागल्याने एक प्रकारचा उत्साह खेळाडूंच्या हालचालीत दिसत होता. सर्वाधिक तापमान १७ अंश आणि सर्वात कमी ८ अंश तापमान म्हटल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना हुडहुडी भरते आहे; तर इंग्लंडच्या खेळाडूंना घरी आल्याचा भास होतो आहे.

Ind vs Eng Test
IND vs ENG 5th Test Pitch Report : राहुल-रोहित इंग्रजांना देणार सरप्राईज; धरमशालेची खेळपट्टी आपला गुणधर्मच सोडणार?

धरमशाला कसोटी सामन्यात अश्विन आणि जॉनी बेअरस्टो आपापला १०० वा कसोटी सामना खेळणार आहेत. एकूण सात वेळा आणि या मालिकेत दोन वेळा अश्विनकडून बाद झालेला ज्यो रूट म्हणतो, अश्विन नेहमी वेगवेगळे चेंडू टाकून फलंदाजाला विचारात ठेवतो, की आता तो नवीन काय करेल. प्रत्येक चेंडू टाकताना अश्विन विचार करतो, हे नक्की.

खेळपट्टीचा अंदाज उद्याच कळणार

दोन दिवस अगोदर मैदानावरच्या खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न दोनही बाजूच्या खेळाडूंनी केला असला, तरी खरा अंदाज सामन्याच्या दिवशीच येणार आहे. अर्थातच खेळपट्टी कितीही फलंदाजीला पोषक किंवा फिरकीला साथ देणारी बनवली, तरी थंडगार हवामानाचा फायदा इंग्लंडचे वेगवान गोलंदाज नक्कीच उचलू शकतात. अर्थातच जसप्रीत बुमरा संघात परतल्याने वेगवान गोलंदाजीची भारताची धार नव्याने दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com