
लंडन : जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स, लियाम डॉसन आणि कर्णधार बेन स्टोक्सविरहित इंग्लंड संघाला नॉकआऊट पंच देऊन मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी भारताला मिळणार आहे. मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना उद्यापासून सुरू होत असून इंग्लंड संघाला अतिरिक्त ताणाचा फटका बसला आहे.