

India vs Pakistan Women Asia Cup 2026 Live Streaming
esakal
India vs Pakistan Women Asia Cup 2026 Live Streaming: महिला आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान(India vs Pakistan) हे आमनेसामने असणार आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे.
परंतु भारत आणि पाकिस्तान यांचा सामना असला की याची उत्सुकता शिगेला पोहोचते. या स्पर्धेचा नववा सामना ५ सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत-पाकिस्तान महामुकाबला थेट कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या सामन्याची वेळ, आणि मोफत कुठे पाहता येणार आहे.