WOMEN’S ASIA CUP 2026: आजपासून टीम इंडियाचा आशिया कपचा थरार! थायलंडविरुद्ध पहिला सामना; जाणून घ्या LIVE कुठे अन् कधी पाहाल

India vs Thailand Women’s Asia Cup 2026: भारतीय महिला संघ आज ३० ऑगस्टपासून महिला आशिया कप २०२६ मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया थायलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
WOMEN’S ASIA CUP 2026

WOMEN’S ASIA CUP 2026

esakal

Updated on

India vs Thailand Women’s Asia Cup 2026: भारतीय महिला संघाचा आशिया कपमधील प्रवास आजपासून सुरू होणार आहे. आज म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी भारताचा सामना थायलंडविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

भारत आणि थायलंड यांच्यातील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी सायंकाळी ७.३० वाजता नाणेफेक होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com