

Asia Cup 2026
esakal
दुबई: महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाची मोहीम आजपासून सुरू होत आहे. भारताकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्य राखणे आवश्यक आहे. भारताचा आज थायलंडविरुद्ध सामना होत आहे.
आशिया करंडक टी-२० मध्ये गेल्या दशकापासून भारतीय महिला संघाचे वर्चस्व राहिले आहे. २०१६-१७ पासून ही स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवली जाऊ लागली तेव्हापासून पाचपैकी तीनदा भारताने विजेतेपद मिळवलेले आहे. पण अधूनमधून कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आलेला आहे.