

India Women vs Sri Lanka
sakal
बँकॉक : आशिया करंडक रायझिंग स्टार्स (उदयोन्मख) महिला क्रिकेट स्पर्धेत येत्या रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश अंतिम सामना होणार आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा पाच विकेट आणि ३९ धावा राखून दणदणीत पराभव केला. यात कर्णधार राधा यादवने अष्टपैलू कामगिरी केली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने पाकिस्तानचे आव्हान ५४ धावांनी संपुष्टात आणले.