INDW vs SAW: भारतीय महिलांचा 10 विकेट्सने दणदणीत विजय, द. आफ्रिका विरुद्ध T20I मालिकेत बरोबरी

India vs South Africa Women: पूजा-राधाच्या धारदार गोलंदाजीनंतर स्मृती मानधनाच्या फटकेबाजीने भारतीय महिला संघाने तिसरा टी२० सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamSakal

India vs South Africa Women 3rd T20I: भारतीय महिला क्रिकेट संघाने मंगळवारी पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचा १० विकेट व ५५ चेंडू राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राखली.

पूजा वस्त्रकार (४/१३) व राधा यादव (३/६) यांची प्रभावी गोलंदाजी व शेफाली वर्मा (नाबाद २७ धावा), स्मृती मानधना (नाबाद ५४ धावा) यांची शानदार फलंदाजी भारतीय संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

India Women Cricket Team
INDW vs RSAW : शेवटच्या षटकात पूजा वस्त्रकारचा चमत्कार; भारताचा 4 धावांनी विजय अन् मालिका खिशात

दक्षिण आफ्रिकन संघाचा डाव ८४ धावांवर गारद झाला. भारतीय संघाने एकही विकेट न गमावता विजयी लक्ष्य ओलांडले.

शेफाली वर्मा व स्मृती मानधना या सलामी जोडीने बिनबाद ८८ धावांची भागीदारी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्मृतीने आपल्या खेळीत आठ चौकार व दोन षटकार मारले. शेफाली हिने तीन चौकार मारले.

त्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकन संघाचा डाव ८४ धावांवरच आटोपला.

India Women Cricket Team
INDW vs RSAW : शाब्बास मुलींनो! स्मृती अन् शफालीनं 90 वर्षाच्या इतिहासात जे झालं नाही ते करून दाखवलं

पूजा वस्त्रकार, राधा यादव यांच्यासह अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. दरम्यान, याआधी भारतीय संघाने एकदिवसीय मालिका व एकमेव कसोटी जिंकली होती. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकन संघावर तीनही प्रकारात वर्चस्व गाजवले.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका - १७.१ षटकांत सर्व बाद ८४ धावा (ताझिमन ब्रिट्‌स २०, ॲनेक बॉच १७, पूजा वस्त्रकार ४/१३, राधा यादव ३/६) पराभूत वि. भारत - १०.५ षटकांत बिनबाद ८८ धावा (शेफाली वर्मा नाबाद २७, स्मृती मानधना नाबाद ५४).

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com