
Team India Won Semifinal Against England : महिलांच्या १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने फायनसमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरूद्ध सेमीफायनलचा सामना भारताने एकतर्फी जिंकला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी ११४ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय सलामीवीर जी कमलिनीच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने भारताने १५ षटकांतच लक्ष्य गाठले व ९ विकेट्सने सामना जिंकला. भारतीय महिला संघ फायनलचा सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे.