
Indian Pacer Siddarth Kaul announced Retirement : सलग दोन हंगामातील आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतासाठी ३ वन-डे व ३ ट्वेंटी-२० सामने खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आयपील २०२५ च्या मेगा लिलावात आपली मूळ किंमत ४० लाख रूपये ठेवली होती. पण तो सर्व फ्रॅंचायझींकडून दुर्लक्षित राहिला. त्यानंतर त्याने आता क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सिदार्थ कौल २००८ सालच्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता, ज्या संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते. त्याचबरोबर सिदार्थ ३ फ्रॅंचायझींकडून आयपीएल क्रिकेट खेळला आहे.
२०१७ सालच्या श्रीलंकेविरूद्धच्या वन-डे संघात तो भारतीय संघाचा भाग होता, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्याने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत १२ जुलै २०१८ रोजी भारतासाठी वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २९ जून २०१८ रोजी त्याने आयर्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.