Women World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाला. कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रमुख फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.या पराभवातून संघाने अनेक महत्वाचे धडे घेतले आहेत आणि पुढील सामने आशावादी दृष्टिकोनातून खेळणे गरजेचे आहे.
विखाशापट्टनम : भारतीय महिला क्रिकेट संघातील टॉप ऑर्डर अर्थातच वरच्या प्रमुख फलंदाजांकडून धावा होत नसल्याचा फटका एकदिवसीय विश्वकरंडकात गुरुवारी बसला. दक्षिण आफ्रिकन संघाकडून भारतीय महिला संघाचा पराभव झाला.