BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये उद्या अखेरचा टी-२० सामना होणार आहे. याप्रसंगी भारतीय महिला संघ या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, यात शंका नाही. बांगलादेशचा संघ घरच्या मैदानावर प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करील.
BAN vs IND women T20
BAN vs IND women T20 sakal

सिलहट (बांगलादेश) : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये उद्या अखेरचा टी-२० सामना होणार आहे. याप्रसंगी भारतीय महिला संघ या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, यात शंका नाही. बांगलादेशचा संघ घरच्या मैदानावर प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करील.

भारतीय संघाने या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे; पण पाऊस व वातावरणाचा फटका बसलेल्या या मालिकेत भारतीय फलंदाजांकडून प्रतिमेला साजेशी कामगिरी झालेली नाही. शेफाली वर्मा हिने एकमेव अर्धशतक झळकावले आहे.

आता उद्या होत असलेल्या अखेरच्या लढतीत हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना या दोन अनुभवी खेळाडूंकडून चमकदार फलंदाजीची अपेक्षा आहे. बांगलादेशातच या वर्षअखेरीस टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

बांगलादेशने भारतीय संघावर २०२३मध्ये अखेरचा टी-२० विजय मिळवला होता. मीरपूरमध्ये त्यांनी हा विजय मिळवला होता. आता बांगलादेशचा संघ भारतीय संघावर एका लढतीत तरी विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com