Tushar Arothe News : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकाच्या घरी पोलिसांचा छापा; 1.1 कोटी रूपये जप्त

Tushar Arothe Police Raid : तुषार अरोठे यांच्या घरावर पोलिसांना छापा टाकला असून त्यांच्या घरातून कोट्यावधी रूपये असलेली एक बॅग मिळाली आहे.
Tushar Arothe
Tushar Arotheesakal

Indian Womens Team Former Coach Tushar Arothe : भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार अरोठे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या घरी पोलिसांचा छापा पडला असून या छाप्यात पैशाने भरलेली बॅग आढळून आली आहे. तुषार अरोठे यांच्या बडोदा येथील घरातून 1.1 कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान तुषार अरोठे हे तपास अधिकाऱ्यांना या पैशाबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर ही रक्कम जप्त करण्यात आली.

Tushar Arothe
MS Dhoni IPL 2024 : आयपीएलमुळं मला संधी मिळाली... 'न्यू रोल' ट्विटनंतर धोनीची अजून एक प्रतिक्रिया

वडोदरा पोलिसांनी तुषार आरोठे यांच्याबाबत एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे ज्यात असे म्हटले आहे की. छाप्यादरम्यान त्याच्या घरातून सापडलेल्या पैशांची माहिती देण्यास तुषार अरोठे अक्षम आहे. हा पैसा कोठून आला आणि त्याचा स्रोत काय हे तुषारला सांगता आले नाही. या कारणास्तव आता त्याची अधिक चौकशी करण्यात येणार असून, रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तुषार अरोठे हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने खूप प्रसिद्धीही मिळवली. याशिवाय त्यांनी भारतीय महिला संघाला कोचिंगही दिले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अरोठे यांनी 114 प्रथम श्रेणी आणि 51 लिस्ट ए सामने खेळले आहेत.

प्रथम श्रेणीमध्ये आरोठे यांनी 31 अर्धशतके आणि 13 शतकांसह 6105 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याच्या नावावर 225 विकेट आहेत. या यादीत 1037 धावा करण्यासोबतच तुषार अरोठेच्या नावावर 30 विकेट्सही आहेत.

Tushar Arothe
MS Dhoni IPL 2024 : आयपीएलमुळं मला संधी मिळाली... 'न्यू रोल' ट्विटनंतर धोनीची अजून एक प्रतिक्रिया

फिक्सिंगमध्येही आलं होतं नाव

तुषार अरोठे आणि पोलीस हे समिकरण आजचं नाही. त्याचं नाव फिक्सिंगमध्ये देखील आलं होते. तुषार यापूर्वी बेटिंग प्रकरणात अडकला होता. 2019 च्या आयपीएल दरम्यान सट्टेबाजी प्रकरणात त्याचे नाव समोर आले होते.

तुषार अरोठेचे गुजरातमध्ये एक कॅफे आहे. या कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात अरोठेसोबत 19 जणांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अरोठेच्या गाडीतून फोन जप्त केला होता. मात्र तपासादरम्यान त्याच्या फोनमध्ये काहीही सापडले नाही.

या संपूर्ण घटनेवर आपले स्पष्टीकरण देताना अरोठे म्हणाले की, माझ्या कॅफेमध्ये अनेकजण ये-जा करतात. त्यांच्या कॅफेमध्ये बेटिंगमध्ये कोण सामील आहे आणि कोण नाही हे त्यांना कसे समजेल? मात्र, अरोठे यांना सट्टेबाजीची माहिती होती, मात्र तो खोटे बोलत असल्याचा पोलिसांचा दावा होता.

(Cricket News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com