
IPL Teams Celebrating Holi: इंडियन प्रिमिअर लीगला अवघे ९ दिवस शिल्लक आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर भारतात आता आयपीएलचे वारे वाहायला लागले आहेत. सर्व खेळाडू आता आपल्या संघाच्या प्रॅक्टीस कॅम्पमध्ये सामील झाले आहेत. अशाच आज संपूर्ण भारतात धुळीवंदन साजरे केले गेले. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीनुसार आयपीएल फ्रॅंचायझींनी व खेळाडूंनी होळी खेळून धुळीवंदनाचा आनंद घेतला. आयपीएल संघांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून होळी खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.