

Ira Jadhav:
esakal
Ira Jadhav selected for India U19 women team: मुंबई महिला क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज आयरा जाधव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर तिने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी घरच्या मालिकेसाठी (Sri Lanka Women's U19 Tour of India) भारतीय अंडर-१९ महिला संघात आयरा जाधवची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, निवड समितीने आयरावर विश्वास दाखवत तिची टी-२० आणि एकदिवसीय या दोन्ही संघांमध्ये निवड केली आहे. आयराची ही दुहेरी निवड मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि सर्व मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे.