
James Anderson Will Play County Championship and T20 Blast 2025 : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने काउंटी चॅम्पियनशिप व ट्वेंटी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळण्यासाठी लँकेशायर संघासोबत एका वर्षाचा करार केला आहे. ४२ वर्षीय जेम्स अँडरसनने जुलै २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या १८८ व्या आणि अंतिम कसोटी सामन्यानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. परंतु आता लँकेशायर संघासोबत करारबद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे.