

Ranji Trophy
sakal
हुबली : जम्मू-काश्मीर संघाने रणजी क्रिकेट करंडकाच्या अंतिम फेरीतील पहिल्या तीनही दिवशी वर्चस्व गाजवले. जम्मू-काश्मीर संघाचा पहिला डाव ५८४ धावांवर आटोपल्यानंतर कर्नाटकची पहिल्या डावात तिसऱ्या दिवसअखेरीस पाच बाद २२० धावा अशी अवस्था झाली आहे. कर्नाटकचा संघ अद्याप ३६४ धावांनी पिछाडीवर आहे. मयांक अगरवाल १३० धावांवर खेळत आहे.