
Jasprit Bumrah Injury Update: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांतीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यादरम्यान त्याला पाठीचे दुखणे अद्भवले होते. त्यामुळे तो अंतिम साम्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी आला नव्हता. त्यानंतर आता बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. या दुखापतीतून सावरण्यावर त्याचा संघातील पुढील सहभाग अवलंबून असेल. त्यामुळे आता बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.