
BCCI Backup Plan Jasprit Bumrah : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत पाठीचे दुखणे उद्भवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याची स्कॅनिंग करण्यात आली होती. पण त्याच्या दुखापतीबद्दल ठोस माहिती समोर आलेली नव्हती. सिलेक्टर अजित आगकर यांनी देखील बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहभागावर अनिश्चितता दर्शवली होती. त्यानंतर आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुमराहाची दुखापत गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे समजत आहे.