
Jasprit Bumrah Ball Tampering by Sandpaper Allegation : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहला अचानक बाहेर बोलावण्यात आले. भारताचा प्रमुख गोलंदाज बाहेर गेल्यामुळे भारतीय चाहत्यांना धक्का बसला. पण इतर गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डावा स्वस्तात गुंडाळला. बुमराहला दुखापत झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बुमराहवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.