
Chris Martin sings a song on Jasprit Bumrah in Coldplay : जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्डप्ले बॅंडच्या या सलग दुसऱ्या कॉन्सर्टमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा उल्लेख केला गेला. नवी मुंबई येथे झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये सिंगर ख्रिस मार्टिनने स्टार गोलंदाजाचा उल्लेख केला होता. पण काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टोडियमवर झालेल्या भारतातील दुसऱ्या कॉन्सर्टमध्ये ख्रिस मार्टिनने जसप्रीत बुमराहवर गाणं गायले आणि या कॉन्सर्टला जसप्रीत बुनमराही उपस्थित होता. गाणं सुरू होताच चाहत्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला व बुमराहने देखील हे गाणं इन्जोय केले.