
ICC Test Ranking : भारताने बॉर्डर गावस्कर मालिका ३-१ ने गमावली. पण या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने सर्व सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. मालिकेत ३२ विकेट्स घेत त्याने मालिकावीर पुरस्कार जिंकला. त्याचबरोबर विकेटकीपर ऋषभ पंतच्या बॅटमधून शेवटच्या सामन्यात मोठी खेळी पाहायला मिळाली. बदलेल्या आयसासी रॅंकिंगनुसार ऋषभने कसोटी क्रमवारीत ३ स्थानांनी झेप घेतली आहे.