
Jasprit Bumrah vs sam konstas Controversy : सिडनी कसोटीत भारतीय संघाचा डाव ऑस्ट्रेलियाने १८५ धावांवर गुंडाळला. त्यानंतर दिवसाअंतीपर्यंत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तीन षटके टाकली. ज्यामध्ये कर्णधार जसप्रीत बुमराहने २ व मोहम्मद सिराजने एक षटक टाकले. पण या दोन षटकांच्या खेळादरम्यान भारतीय कर्णधाराविरूद्ध युवा सॅम कॉन्स्टास आक्रमक फलंदाजी करताना दिसला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कॉन्स्टासने बुमराहला चौकार लगावला.