
Best Fielder of this Generation: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने भारतीय संघाविरूद्ध चांगली लढत दिली, पण त्यांना ४ विकेट्सने सामना गमवावा लागला. न्यूझीलंडला जरी सामना गमवावा लागला असला, तरी न्यूझीलंडचा फिल्डर ग्लेन फिलिप्स सामन्यात चर्चेचा विषय ठरला. त्याने घेतलेला शुभमन गिलचा झेल फारच अप्रतिम होता. फिलिप्सने स्पर्धेतील सर्वच सामन्यांत हवेत झेपावत झेल पकडले. संपूर्ण स्पर्धेत तो चर्चेत आला आणि फिलिप्स या पिढीतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे आता दिग्गज श्रेत्ररक्षक जोन्टी ऱ्होड्सने देखील मान्य केलं आहे.