
बॅकनहॅम : ‘हे क्रिकेट, मला पुन्हा एकदा संधी दे’ अशी करुण नायरने केलेली भावनिक साद काही काळापूर्वी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्यांदा भारतीय संघात स्थान मिळाले खरे; परंतु तो त्या संधीचे सोने करू शकला नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी चौथ्या कसोटीत त्याला वगळले जाण्याची शक्यता अधिक आहे.