
Kevin Pietersen and Shane Watson's Advised to Prithvi Shaw: पृथ्वी शॉने भारतीय क्रिकेटमध्ये कमी वयात यश मिळवले. २०१८ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक ( १३४) झळकावले होते आणि कसोटीत शतक झळकावणारा तो सातवा ( १८ वर्ष व ३२९ दिवस) युवा फलंदाज ठरला होता. पण, २०२० चा ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. या दौऱ्यात दुखापतीमुळे पृथ्वी संघाबाहेर गेला तो गेलाच. जुलै २०२१ मध्ये तो भारताकडून शेवटची वन डे व ट्वेंटी-२० मॅच खेळला आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये पण पृथ्वीचा फॉर्म घसरला.