
वर्ल्ड कप १९८३ विजयाला आता ४२ वर्षे उलटून गेल. नुकतीच २५ जून रोजी ४२ वर्षे या विजेतेपदाला पूर्ण झाली! त्यानिमित्त वर्ल्ड कप १९८३ च्या अनेक हिरोंपैकी एका हिरोशी बातचीत केली! हा हिरो होता बलविंदर सिंग संधू!
वर्ल्ड कप १९८३ च्या फायनलमध्ये या माणसाने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हींमध्ये संघासाठी खूप महत्वाची कामगिरी केली. सर्वप्रथम बॅटिंगबद्दल बोलू. संधू ११व्या क्रमांकावर बॅटिंगला आला. तेव्हा भारताचा स्कोअर होता ९ बाद १५१! अकराव्या क्रमांकापर्यंत आपली बॅटिंग डेप्थ होती असं तेव्हा बोललं जायचं ते प्रत्यक्षात आणि मोक्याच्या वेळी संघाने अनुभवलं ( By the way, संधूनी खेळलेल्या ८ टेस्टसमध्ये पदर्पणात ७१ रन्स केल्या नंतर वेस्ट इंडिजमध्ये ब्रिजटाऊनला ६८ रन्सचा महत्वपूर्ण डावही खेळला होता, त्यांचे कसोटी सरासरी ३०+ इतकी चांगली आहे) किरमाणी- संधू जोडीने स्कोअर १८३ पर्यंत नेला. संधूने खूप उपयुक्त नाबाद ११ रन्स केल्या. वेस्ट इंडिजने सामना केवळ ४३ रन्सनी गमावला हे येथे लक्षात घेणे आवश्यक!