India Head Coach : 'माझ्याकडे वेळ नाही...' आणखी एका दिग्गजाने टीम इंडियाचा कोच होण्यास दिला नकार

Team India Head Coach News : बीसीसीआय भारतीय संघासाठी नवीन कोचच्या शोधात व्यस्त आहे. राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा पुढचा मुख्य कोच कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे आहे.
Kumar Sangakkara on Team India Head Coach
Kumar Sangakkara on Team India Head Coachsakal
Updated on

Kumar Sangakkara on Team India Head Coach : बीसीसीआय भारतीय संघासाठी नवीन कोचच्या शोधात व्यस्त आहे. राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा पुढचा मुख्य कोच कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे आहे.

भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत, ज्यांचा कार्यकाळ आयसीसीस टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर संपेल. बीसीसीआयने म्हटले आहे की जो कोणी भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होईल, त्याचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरू होईल. या एपिसोडमध्ये मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सामील असलेल्या आणखी एका खेळाडूने जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

Kumar Sangakkara on Team India Head Coach
Hardik Pandya divorced : हार्दिक पांड्याचा झाला घटस्फोट? पत्नी नताशा घेणार 70 टक्के प्रॉपर्टी.... सोशल मीडियावर रंगली चर्चा

हा दिग्गज खेळाडू दुसरा कोणी नसून राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा आहे. संगकाराला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र या खेळाडूने स्वत: पुढे येऊन त्याला नकार दिला आहे.

तो म्हणाला की, बीसीसीआयने मला मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी संपर्क साधला नाही आणि एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी माझ्याकडे वेळही नाही. राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनून मला खूप आनंद होत आहे. अशाप्रकारे या शर्यतीतून आणखी एक खेळाडू कमी झाला आहे. संगकारापूर्वीही अनेक दिग्गज खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला होता.

Kumar Sangakkara on Team India Head Coach
IPL 2024: काय सांगता! आयपीएल फायनलमध्ये खेळणार नाहीत टी20 वर्ल्ड कपमधील एकही भारतीय खेळाडू? जाणून घ्या कारण

बीसीसीआयने राहुल द्रविडला हवा असेल तर तो कार्यकाळ वाढवू शकतो, अशी ऑफर दिली होती, मात्र आपण कार्यकाळ वाढवणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. याशिवाय न्यूझीलंडचे माजी दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग यांनीही मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत कुमार संगकाराला ही जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यानेही त्याला नकार दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जस्टिन लँगर आणि रिकी पॉन्टिंग म्हणाले होते की बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी नकार दिला होता. यावर बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही कोणीही संपर्क साधला नाही. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड प्रक्रियेद्वारे केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com