

Champions Trophy 2025: रावळपिंडीत सामना म्हणजे आसपासच्या दुकानदारांचा तोटाच होत असतो. येथे सामना असतो तेव्हा सुरक्षेचे कारण देत स्टेडियमच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढतात. बाजार बंद करतात. दुकाने उघडायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सामना असला की स्थानिक लोक जाम वैतागतात.