
लॉर्डस् : मालिकेत १-१ बरोबरी, सध्या तरी दिसणारी हिरवे गवत असलेली खेळपट्टी, जसप्रीत बुमरा आणि जोफ्रा आर्चर यांचे पुनरागमन आणि गरम हवामानाचा अंदाज, अशा स्थितीत क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता ताणली आहे.