IPL 2024 : आयपीएलच्या हंगामापूर्वी LSG ची मोठी घोषणा! 'या' खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

IPL 2024 Nicholas Pooran as vice-captain LSG : आयपीएल 2024 थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे.
Lucknow Super Giants appoint Nicholas Pooran as vice-captain Marathi News
Lucknow Super Giants appoint Nicholas Pooran as vice-captain Marathi Newssakal

Lucknow Super Giants appoint Nicholas Pooran as vice-captain : आयपीएल 2024 थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. स्पर्धेसाठी सर्व संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. लखनऊने यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्याने वेस्ट इंडिजचा क्रिकेटर निकोलस पूरनला उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. लखनऊने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

Lucknow Super Giants appoint Nicholas Pooran as vice-captain Marathi News
Irfan Pathan : 'भारतीय क्रिकेट सुधारायचं असेल तर...' हार्दिक पांड्यावरून इरफानने BCCIला दिला मोठा सल्ला

केएल राहुल यावेळीही लखनऊ सुपरजायंट्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तो अद्याप पूर्णपणे बरा नाही आणि दुखापतीमुळे लंडनला गेला आहे, पण आयपीएल सुरू होईपर्यंत तो बरा होईल, असा विश्वास आहे.

केएल राहुलने आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांचे नेतृत्वही केले होते, परंतु त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. यानंतर संघाची कमान कृणाल पांड्याकडे होती. आता जर केएल राहुल पुन्हा आयपीएल खेळला नाही तर निकोलस पूरन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसले.

Lucknow Super Giants appoint Nicholas Pooran as vice-captain Marathi News
KL Rahul IND vs ENG 5th Test : राहुल आऊट तर बुमराह... पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआयने संघ केला अपडेट

आतापर्यंत आयपीएलचे दोन हंगाम खेळलेल्या लखनौ सुपरजायंट्स संघाची कामगिरी चांगली असली तरी संघ विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला आहे. जर आपण शेवटच्या हंगामाबद्दलच बोललो तर, ते प्लेऑफपर्यंत गेले. मात्र संघाचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला. संघाने गेल्या मोसमात साखळी फेरीत 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 2022 मध्येही संघाची अशीच स्थिती होती. त्यानंतर संघाने 14 पैकी 9 सामने जिंकले होते आणि 5 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com