
World Rapid and Blitz Chess Championship : शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेमधून विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बाहेर केले गेले आहे. कार्लसनने FIDE च्या ड्रेस कोडचे उल्लंघन केले. त्यानंतर कार्लसनला २०० युएस डॉलर्स दंडासह जीन्स बदलण्यासची सूचना देण्यात आली. पण कार्लसनने जीन्स बदलण्यास नकार दिल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्याची कारवाई करण्यात आली.
दंडानंतर, मुख्य लवाद ॲलेक्स होलोझॅकने कार्लसनला तातडीने पोशाख बदलण्यास सांगितले. तथापि, कार्लसनने नकार दिला आणि स्पर्धेच्या 9व्या फेरीतून तो अपात्र ठरला आहे.