
38th National Games: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील देदीप्यमान यश रविवारीही कायम राहिले. या मानाच्या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राने पदकांचे अर्धशतक पूर्ण केले. महाराष्ट्राने सुवर्णमहोत्सव साजरा करताना १३ सुवर्णांसह २२ रौप्य अन् १५ ब्राँझपदकांची लयलूट केली आहे. याचबरोबर महाराष्ट्राने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.