
IND vs NZ Champions Trophy Final Live: दुबई आंतरराषट्रीय मैदानावर भारत व न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला सुरूवात झाली आहे. भारताने आज सलग १५ वा नाणेफेक गमावला. नाणेफेकीचा कौल जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाने दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विजेतेपदाच्या या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून चाहते देखील उत्सुक आहेत. पण सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा एक खेळाडू रडताना पाहायला मिळाला. पण हा खेळाडू नेमका कोण होता व का रडत होता जाणून घेऊयात.