

Ground Staff
esakal
MCA announces ₹25 lakh bonus for ground staff: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या क्रिकेट परिवारासाठी मोठा आणि अभिमानास्पद निर्णय घेतला आहे. मैदानाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मैदान कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेत एमसीएने त्यांना २५ लाख रुपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे.
त्याचबरोबर मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या दिवंगत क्रिकेटपटूंच्या पत्नींना आर्थिक आधार मिळावा, यासाठी निवृत्तीवेतन सहाय्य योजना सुरू करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.