
Mumbai Indians Players Interaction with CSK Fans Video: उद्या चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी मानला जाणाऱ्या संघांमध्ये रंगणार आहे. त्यामुळे मागचे काही दिवस या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या चाहत्यांकडून वातावरण निर्मिती केली जात आहे. या सामन्यासाठी मुंबईची पलटन काल चेन्नईमध्ये दाखल झाली, यावेळी चेन्नईकरांनी Mumbai Indians संघाला पाहाण्यासाठी विमानतळावर गर्दी केली होती. त्यानंतर चेपॉकवर मुंबईकरांचा सराव पाहाण्सासाठी देखील सीएसकेचे चिमुकले चाहते जमले.