
MI vs DC WPL 2025 : महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामातील पहिला सामना मुंबई इडियन्स आज दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पहिल्या हंगामातील विजेत्या संघासमोर आज मेग लॅनिंग, शफाली वर्माचे आव्हान असणार आहे. मुंबई इडियन्स संघात १९ वर्षीय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई संघ युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.