Mohammed Shami Update : 'माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले अन् मी...' मोहम्मद शमीने दिली मोठी अपडेट

Mohammed Shami Health Update News : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 पासून मैदानापासून बाहेर आहे.
Mohammed Shami Update Latest Marathi News
Mohammed Shami Update Latest Marathi News sakal

Mohammed Shami Health Update News : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 पासून मैदानापासून बाहेर आहे. वर्ल्ड कपमध्ये तो जखमी झाला होता. आता त्याने दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची प्रकृती कशी आहे. यावर अपडेट दिले आहेत. शमीने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या रिकव्हरीच्या प्रगतीची माहिती दिली. शमीने तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने त्याच्या टाचांचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Mohammed Shami Update Latest Marathi News
IPL 2024 : "पैसे कमवणे ठीक पण.." आयपीएलवरून हार्दिक पांड्याला माजी क्रिकेटरने धुतले

खरंतर, शमीने X वर काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मला माझ्या रिकव्हरी प्रोग्रेसबद्दल अपडेट द्यायचे आहे." माझ्या शस्त्रक्रियेला १५ दिवस झाले आहेत आणि मी नुकतेच टाके काढले आहेत. आता मी पुढील प्रक्रियेबद्दल विचार करत आहे. दुखापतीमुळे शमी आयपीएल 2024 मध्ये खेळू शकणार नाही. शमी लवकर बरा व्हावा यासाठी बीसीसीआयने त्याचे अभिनंदन केले आहे.

Mohammed Shami Update Latest Marathi News
IPL 2024 : कोण असणार माहीचा उत्तराधिकारी? CSK नवीन कर्णधार निवडण्याच्या तयारीत, धोनी घेणार मोठा निर्णय

अलीकडील अहवालानुसार, या शस्त्रक्रियेनंतर बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध (ऑक्टोबर-नोव्हेंबर) मायदेशात होणाऱ्या कसोटी सामन्यांपूर्वी तो परत येण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मार्की अवे मालिकेत थेट खेळताना दिसणार आहे. शमी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकेल का, असाही प्रश्न आहे.

शमी भारताकडून अखेरचा एकदिवसीय वर्ल्ड कप फायनल नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. शमीने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 7 सामन्यात 24 विकेट घेत भारतासाठी चमकदार कामगिरी केली.

Mohammed Shami Update Latest Marathi News
IPL 2024 : कोण असणार माहीचा उत्तराधिकारी? CSK नवीन कर्णधार निवडण्याच्या तयारीत, धोनी घेणार मोठा निर्णय

दुखापत असुनही तो वेदना सहन करू खेळला. गोलंदाजी करताना त्याला लँडिंगमध्ये अडचणी येत होत्या. पण त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर झाला नाही. नुकताच शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शमीने आपल्या एका दशकाहून अधिक काळातील कारकिर्दीत 229 कसोटी, 195 एकदिवसीय आणि 24 टी-20 विकेट्स घेतल्या आहेत.

शमीने आयपीएल 2023 मध्येही चमकदार कामगिरी केली होती. शमीने 17 सामन्यात 18.64 च्या सरासरीने सर्वाधिक 28 विकेट घेतल्या होत्या. शमीची आयपीएल कारकीर्द जबरदस्त राहिली आहे. आतापर्यंत त्याने 110 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 26.87 च्या सरासरीने आणि 8.44 च्या इकॉनॉमी रेटने 127 बळी घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com