
MS Dhoni New Car Jaguar F-Type : भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला बाईक्स व कार्स प्रचंड आवडतात. आपल्याला धोनी अनेकादा बाईक रायडिंग करताना पाहायला मिळतो. त्याचे बाईक रायडिंगचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आसतात. धोनीकडे वेगवेळ्या कंपन्यांच्या स्पोर्ट्स कार व बाईक्सचे कलेक्शन आहे. त्याला विंटेज कार्स जास्त आवडतात. धोनीच्या रांचीतील घराबाहेर विविध कंपनींच्या कार्स पाहायला मिळतात. यावेळी धोनी रांचीमध्ये जग्वार एफ-टाईप कार ड्राईव्ह करताना पाहायला मिळाला. महत्त्वाचे म्हणजे उद्योगपती रतन टाटा यांना ही कार प्रचंड आवडायची.