
MS Dhoni Viral Video : इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. सीएसके संघाने सर्वात आधी आयपीएलच्या सरावाला सुरूवात केली. यावेळी एमएस धोनी चेन्नईत उपस्थित होता. त्यानंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नाला चेन्नई सुपर किंग्जच्या माजी कर्णधाराने हजेरी लावली होती. लग्नात धोनीच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एमएस धोनीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रावडी लूकमध्ये व ५-६ बॉडीगार्ड्सह पाहायाला मिळत आहे.