
MS Dhoni Watching IND vs PAK Champions Trophy Match 2025: दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर आज भारत पाकिस्तान सामना रंगला आहे. जगभरतील क्रिकेट चाहते भारत पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना आवर्जून पाहातात. भारत-पाकिस्तानमध्ये तर घरोघरी हा सामना पाहिला जातो. भारत पाकिस्तान हा नेहमीच हाय वॉल्टेज सामना होता. आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधील या सामन्याचा आनंद भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील घेत आहे. यावेळी धोनी बॉलिवूड अभिनेता सनी देओलसोबत हा सामना पाहात आहे.