
ZIM vs AFG Allah Ghazanfar 5 Wickets Haul : अफगाणिस्थानचा युवा गोलंदाज अल्लाह गझनफरला आयपीएल २०२५ लिलावात मुंबई इंडियन्सने संघात सामील केले. वेगवान गोलंदाजांचा भरणा असलेल्या मुंबईने या युवा फिरकीपटूला ४ कोटी ८० लाख रूपयांत करारबद्ध केले. सध्या सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरूद्ध झिम्बाब्वे मालिकेत त्याने संघातील स्वत:चे स्थान उल्लेखनीय कामगिरीसह सिद्ध केले आहे.