

Mumbai Indians Signed Afghan off spinner Mujeeb Ur Rahman : मुंबई इंडियन्स संघात आता नव्या स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. इंडियन प्रिमिअर लीग २०२५ साठी मुंबईने अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमानला संघात करारबद्ध केले आहे. त्यामुळे स्टार वेगवान गोलंदाजांचा भरणा असलेल्या मुंबईच्या ताफ्यात आता ३३० ट्वेंटी-२० विकेट्स घेणारा मिस्ट्री स्पिनर पाहायला मिळणार आहे.