
Shams Mulani and Tanush Kotian Big Knocks : सुरुवातीचे फलंदाज कितीही नावाजलेले असले तरी ते अपयशी ठरणे आणि तळाच्या फलंदाजांनी डाव सावरणे हे मुंबई संघाचे तयार झालेले समीकरण उपांत्यपूर्व फेरीतही कायम राहिले. शम्स मुलानी (९१) आणि तनुष कोटियन (९७) मुंबईसाठी तारणहार ठरले. या दोन मोठ्या खेळींच्या सात बाद ११३ अशा दारुण संकटात सापडलेल्या मुंबईला पहिल्या डावात ३१५ धावांपर्यंत मजल मारता आली.