

Mumbai vs Andhra In Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आंध्राच्या आघाडीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. आंध्राच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी करत डावात २२९ धावा उभारल्या. हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर मुंबईने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकला असे वाटले होते. पण अजिंक्य रहाणेने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ५४ चेंडूत ९५ धावांची तुफानी खेळी केली आणि मुंबईच्या दिशेने विजय खेचून आणला. या चुरशीच्या सामन्यात मुंबईने ४ विकेट्सने विजय नोंदवला आणि स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक दिली.