
School Cricketer Scored 400 Runs in ODI: कौशल्य आणि शक्तीचे आश्चर्यकारक प्रदर्शन करताना, मुस्तकीम हावलदारने वन-डे क्रिकेटमध्ये १७० चेंडूत ४०४* धावा कुटल्या आणि बांगलादेशच्या शालेय क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या डावात मुस्तकीमने एकूण ५० चौकार आणि २२ षटकार ठोकले. बांगलादेशच्या मान्यताप्राप्त क्रिकेटमधील ही सर्वात मोठी खेळीआहे. राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेच्या ढाका विभागात गट टप्प्यातील एका सामन्यादरम्यान हा अविश्वसनीय पराक्रम साध्य झाला आणि त्यामुळे देशाला एक नवा उदोयन्मुख खेळाडू मिळाला.