
Sonali Pande Australian Deaf Cricket Team Doctor: नागपूरची कन्या सोनाली पांडेची ऑस्ट्रेलियन कर्णबधिर क्रिकेट संघासाठी टीम डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑर्थोपेडिक सर्जन सोनाली पांडे ऑस्ट्रेलियन संघासोबत क्रीडा आणि व्यायाम औषध डॉक्टर म्हणून काम करणार आहे. ती सध्या तिरंगी वन-डे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली आहे आणि तीने भारतीय मूकबधिर क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.