
लीड्स : हेडिंग्ले कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीत कर्णधार म्हणून शुभमन गिल याने आखलेल्या डावपेचांवर टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी गिलच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले.